निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
883 subscribers
49 photos
1 video
10 files
19 links
मराठी माध्यमातुन निबंध लेखनाची तयारी!
Download Telegram
दर्जेदार लेख, आकृत्या तसेच माहिती मराठी मध्ये ऊपलब्ध करून देता यावी. जेणे करून त्या गोष्टींचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे.

आपल्याला जर या चॅनलचा ऊपयोग होत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना या चॅनल ची लिंक पाठवा.

धन्यवाद 🤗
लिंक 👇🏾

https://t.me/UPSCin_Marathi
मी UPSC च्या मुख्य परीक्षेची मराठी माध्यमातून तयारी करतांना मला खूप अडचणी भेडसावल्या, तेव्हा मला नेहमी वाटायचे की मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांसाठी एखादा हक्काचा प्लॅटफॉर्म असायला हवा.

ज्यावर परीक्षा देतांना येणार्‍या अडचणींवर उपाय शोधले पाहिजेत. जेणे करून अगोदरच 'आर्थिक, सामजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक' आवाहनांना तोंड देणार्‍या, परीक्षार्थीचा मार्ग थोडातरी सुखदायक होईल. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या तसेच इंग्रजीबद्दल न्यूनगंड असणार्‍यांना ज्या समस्या भेडसावतात त्यांची जाणीव असल्याने, शेवटच्या वर्षी upsc मुख्य परीक्षा देतांना हे चॅनेल काढले व कालांतराने यावर अ‍ॅक्टिव्ह देखील झालो.

हे सर्व चालू असतांनाच मध्यंतरी mpsc ने राज्य सेवा मुख्य परीक्षेची पध्दती मध्ये बद्दल केला आणि ती देखील आता upsc च्या धर्तीवर वर्णनात्मक झाली. त्यामुळे अर्थातच आता मराठी मध्ये upsc करणारे परीक्षार्थी वाढतील. या सर्वांच्या ध्येयपूर्तीच्या मार्गातील वाटाड्या होण्याच्या या मार्गातील हजारी टप्पा आज पूर्ण होतोय. त्याचा खूप आनंद होतोय, या प्रयत्नांत आपण दिलेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आपले खूप आभार.
धन्यवाद🙏 ❤️


@UPSCin_Marathi
मला_माणसाला_शोधायचे_आहे_!.pdf
2 MB
युपीएससीच्या प्रचलित पद्धती नुसार सुमारे 1000-1200 शब्दांत दोन निबंध लिहणे अनिवार्य असते. कदाचित एमपीएससीचा देखील निबंधाचा पेपर याच पद्धतीचा असेल. आपण जर सुरुवातीला थेट 1000+ शब्द एखाद्या विषयावर लिहायला सुरवात केली तर आपल्याला ते अशक्यप्राय वाटायला लागते.

त्यामुळे आता निबंधाची तयारी करतांना सुरुवातीला आपल्याला टप्या टप्प्याने शब्द मर्यादा वाढवली पाहिजे. जस की तुम्ही सुरवातीला 200-300 शब्द लिहू शकता आणि नंतर ती वाढत नेऊन 1000+ पर्यन्त घेऊन जाऊ शकता.

सुरुवातीला निबंधाचा विषय हा तत्त्वज्ञानात्मक असायला नको कारण ते लिहता येणार नाही आणि आपण परत प्रयत्न करणार नाहीत. मी तीन वेळा #upsc मुख्य परीक्षा लिहिली आहे आणि तिन्ही वेळा माझे निबंधाचे गुण 128, 132 आणि 133 आले आहेत. त्यामुळे निबंधाच्या बाबतीत ज्या गोष्टी #upsc मध्ये चांगले गुण मिळवून देतात, त्या मी आपल्या सोबत या टेलिग्राम चॅनलच्या (@EssayInMarathi) माध्यमातून शेअर करणार आहे.

(1/2)

@UPSCin_Marathi @PSIRin_Marathi
(2/2)
त्यासाठी एक नमुना म्हणुन 400 शब्दांचा एक निबंध सोबत जोडत आहे. तो वाचून घ्या आणि आता पासून लिखाण करायला सुरुवात करा. आता पासून लिहायला सुरुवात केली नाही तर तुम्हाला नंतर निबंध लिहितांना प्रचंड भिती वाटेल एवढे लक्षात ठेवा. धन्यवाद!

Join us on Telegram
@EssayInMarathi
@UPSCin_Marathi
@PSIRin_Marathi
उत्पन्न व संपत्ती यांच्या विषम वाटपाचं ऐतिहासिक ओझं असलेला भारत स्थिर गतीने अधिकाधिक विषम समाज होतो आहे.

जग आपल्याबद्दल काय विचार करतं, हे महत्त्वाचं असतं. पण आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, हे बहुधा जास्त महत्त्वाचं असतं. ब्रिटिश वासाहतिक राजवटीपासून आपण स्वतंत्र झालो, त्या घटनेला 75 वर्षं पूर्ण होत असताना आपण स्वतःला याबाबत प्रश्न विचारायला हवेत - भारताची कामगिरी कशी आहे? भारतीय कशी कामगिरी करत आहेत? राष्ट्र म्हणून व लोक म्हणून आपण संविधानात नमूद केलेल्या आदर्शांची कितपत पूर्तता केली आहे? आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या आशा आपण कितपत पूर्ण केल्या आहेत?

- रामचंद्र गुहा

या लेखातील मतांशी तुम्ही सहमत असा किंवा नसा पण यातील आकडेवारी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तसेच काही युक्तिवाद आणि निबंधाची मांडणी कशी असावी यासाठी हा लेख नक्की वाचा.

Join @UPSCin_Marathi

https://kartavyasadhana.in/view-article/Ramchandra-Guha-India's-Seventy-Five-An-Independent-Nation-But-Not-an-Independent-People
Forwarded from Niranjan's Blog☘️
राज्यसेवा 2023 वर्णनात्मक मुख्य परीक्षेसाठी मार्गदर्शन, येथून पुढे अभ्यासाचे नियोजन कसे असावे? वैकल्पिक विषय कसा निवडावा यासंबंधी एक मार्गदर्शनपर सत्र आपल्या @niranjan_blog या telegram channel वर दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता घेणार आहोत. यामध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयासह युपीएससी मुख्य परीक्षा देण्याचा अनुभव असलेले ज्ञानेश्वर जाधव सर(NET-PSIR) आपल्याला मार्गदर्शन करतील. यासोबतच तुम्ही तुमचे प्रश्न आणि शंकाही विचारू शकाल.
Forwarded from Niranjan's Blog☘️
राज्यसेवा 2023 वर्णनात्मक मुख्य परीक्षेसाठी मार्गदर्शन, येथून पुढे अभ्यासाचे नियोजन कसे असावे? वैकल्पिक विषय कसा निवडावा यासंबंधी एक मार्गदर्शनपर सत्र आपल्या @niranjan_blog या telegram channel वर आज दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता घेणार आहोत. यामध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयासह युपीएससी मुख्य परीक्षा देण्याचा अनुभव असलेले ज्ञानेश्वर जाधव सर(NET-PSIR) आपल्याला मार्गदर्शन करतील. यासोबतच तुम्ही तुमचे प्रश्न आणि शंकाही विचारू शकाल.

Link for live stream👇

https://t.me/niranjan_blog?livestream
आज संध्याकाळी 7 वाजता सर्वांनी निरंजन कदम सर (ACST-2019) यांच्या @niranjan_blog या टेलिग्राम चॅनल नक्की भेट द्या व सोबत जोडलेल्या live stream मध्ये सहभागी व्हा.

आजच्या सेशनमध्ये नव्याने वर्णनात्मक पध्दतीने अभ्यास करण्याची सुरुवात कशी करता येईल. मराठी मध्ये कोणते संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का? मराठी मधून तयारी करताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात. तसेच यूपीएससी आणि एमपीएससीचा सोबत अभ्यास करणे शक्य आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आपले काही प्रश्न असल्यास, त्यांची देखील उत्तरे दिले जातील. धन्यवाद🙏🏾

https://t.me/niranjan_blog?livestream

Join
@UPSCin_Marathi
Audio
राज्यसेवा 2023 चा जो नवीन वर्णनात्मक पॅटर्न आयोगाने अंमलात आणायचा ठरवला आहे. त्या अनुषंगाने तयारी कशी करावी, त्यात विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या/अडचणी भेडसावतात. यासंदर्भात या व्हॉइस चॅटमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे व्हॉइस चॅट निरंजन कदम सर यांच्या @niranjan_blog या चॅनलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.

ही माहिती नवीन पॅटर्ननुसार
#MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह यूपीएससीची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांना देखील उपयोगाची ठरेल.

Join
@UPSCin_Marathi
भाषेतील लिंगभेद, यासंदर्भातील मराठी वाक्प्रचार आणि स्त्रीयांचे सामजिक स्थान या अनुषंगाने या लेखात मांडणी आहे. स्त्रियांच्या संदर्भातील निबंधा मध्ये आपण यातील उदाहरणांचा वापर करू शकतो.

Join
@EssayInMarathi
मराठी अभ्यास साहित्याची यादी या video मध्ये आपण शेअर केली आहे नक्की बघा.

यात कोणते पुस्तक कसे वाचावे, तसेच त्यातील कोणता घटक परीक्षेच्या दृष्टीने सुसंगत आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिरिक्त काय वाचवं लागेल देखील यात discuss केलेले आहे.

#mainsbooklist

Join @UPSCin_Marathi

https://youtu.be/v7GLbsqW8ys
निबंधाची मराठी माध्यमातून तयारी pinned «मराठी अभ्यास साहित्याची यादी या video मध्ये आपण शेअर केली आहे नक्की बघा. यात कोणते पुस्तक कसे वाचावे, तसेच त्यातील कोणता घटक परीक्षेच्या दृष्टीने सुसंगत आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिरिक्त काय वाचवं लागेल देखील यात discuss…»
महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या संदर्भात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ही आकडेवारी वापरता येईल.

#GS2 #GS1 #निबंध

Join @UPSCin_Marathi
शिक्षण, धर्म, जीवन पद्धती या सर्व विषयांवर तात्विक अंगाने निबंध लिखाण करतांना यातील अधोरेखित केलेला घटक ऊपयोगाचा ठरू शकेल.

Join @EssayInMarathi
काही क्षणांसाठी यातील राजकीय टीका टिप्पणीला बाजूला ठेवले तर यात जो मुद्दा उपस्थित केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे.

Learning loss =शिक्षणातील नुकसान

याचा उल्लेख आपण उत्तरात करू शकतो, हा मुद्दा सर्व GS तसेच निबंधात वापरला जाऊ शकतो.

Join
@UPSCin_Marathi
यातील विविध उदाहरणे तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतील स्पर्धात्मक आणि विविधता यासंदर्भात देण्यात आलेली माहिती निबंधात वापरता येऊ शकते.

Join
@EssayInMarathi
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपल्या YouTube
चॅनलची customize लिंक active झाली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले, धन्यवाद 🙏🏾

लिंक 👇🏾


https://www.youtube.com/c/UPSCinMarathi

अजूनही आपण चॅनल subscribe केले नसेल तर नक्की करा.


Join @UPSCin_Marathi
या उपक्रमाची कल्पना मांडणारे शिक्षक भक्तराज गर्जे आणि ती सत्यात उतरवण्यासाठी त्यांना पाठबळ देणारे मुख्याध्यापक अशोक घोदे या दोघांचे करावे तितके कौतुक कमी आहे.

या उपक्रमात अनेक प्रतिगामी विचारांना तडा देण्याचे काम तर झालेच आहेत, सोबतीला मुलांना स्वावलंबी बनवून तथाकथित स्त्रियांसाठी असलेले काम म्हणुन स्वयंपाक बनवण्याच्या कामाकडे बघण्याचा, त्यांचा दृष्टिकोन देखील बदलला आहे.

या संकल्पनेला विरोध केला नाही यासाठी, कुल्लाळवाडी गावातील ग्रामस्थांचे देखील कौतुक केले पाहिजे. यातून विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखले जाईल यात काहीच शंका नाही.

तसेच मुलींसाठी सायकल स्पर्धा आणि मुलांसाठी माझी भाकरी स्पर्धा आयोजित करतांना लिंगभेदी मानसिकतेला देण्यात आलेला तडा दूरगामी बद्दल घडविणारा असेल, यात शंकाच नाही.

पालकांच्या कामानिमित्त होणार्‍या मौसमी स्थलांतरात मुलांच्या शाळेत खंड पडण्यावर उपाय म्हणुन ही स्पर्धा रामबाणउपाय ठरत असल्याचे पाहून आनंद झाला.

आता मुलींच्या शाळेत खंड पडण्यावर देखील उपाय काढणे गरजेचे आहे. कारण सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना कुटुंबा सोबत स्थलांतर करावे लागते. त्यासाठी सायकल स्पर्धा किंचित मदतीचे ठरेलही पण आणखी उपाय अपेक्षित आहेत.

कुल्लाळवाडी 🖤🙌🏾.


https://youtu.be/3OBdpWPcAXw


Join
@EssayInMarathi
आशिया कप सुरू झाल्याच्या नंतर किंवा त्या अगोदर देखील श्रीलंका क्रिकेट संघ कोणाच्याही संभाव्य विजेत्यांच्या यादीत कुठेच नव्हता. तरी देखील सांघिक भावना आणि एकजुटीच्या जोरावर त्यांनी त्यांचे सर्वोत्तम दिले आणि विजय खेचून आणला.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते जग तुमच्याबद्दल काय विचार करते त्यापेक्षा तुम्ही स्वतः बद्दल काय विचार करताय हे महत्वाचे आहे. तसेच तुम्ही स्वतःबद्दलचा स्वतःचा विचार सत्यात उतरवण्यासाठी किती मेहनत घेताय, हे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. जीवनात अनेक वेळा आपल्या क्षमतांवर अविश्वास दाखवला जातो. आपल्या कडून काही गोष्टी साध्यच होऊ शकत नाही, असे वारंवार सांगितले जाते. पण आपण धैर्याने उभे राहायला हवे आणि विजय खेचून आणला पाहिजे.

शेवटी इतिहास लढणार्‍याचीच दखल घेतो!

Join
@UPSCin_Marathi