निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
897 subscribers
49 photos
1 video
10 files
19 links
मराठी माध्यमातुन निबंध लेखनाची तयारी!
Download Telegram
या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मराठी माध्यमातून निबंधाच्या तयारी साठी अभ्यास साहित्य पुरवले जाईल.

Join @EssayInMarathi
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक सोबतच्या छायाचित्रात आहे.

Join @EssayInMarathi
मराठी माध्यमातून #UPSC ची तयारी करतांना येणार्‍या विविध अडचणीच्या बाबतीत सोबत जोडलेल्या ब्लॉग मध्ये मांडणी केली आहे. आता #MPSC ने देखील राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पध्दत अवलंबली असल्याने यातील काही समस्यांवर नक्कीच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

त्यातील काही समस्या कमी व्हाव्या यासाठी @UPSCin_Marathi @PSIRin_Marathi आणि @EssayInMarathi
हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहेत. इथून पुढे या सर्व चॅनल वर नियमित संवाद साधला जाईल. ब्लॉग नक्की वाचा आणि कमेन्ट मध्ये सांगा आणखी काय समस्या वाटतात. धन्यवाद!

http://mauliwrites.blogspot.com/2019/11/Upsc-In-Marathi-Medium.html
फक्त #MPSC चा अभ्यास करणार्‍या अनेकांच्या मनात #MPSC च्या नवीन परीक्षा पद्धतीमुळे भीती निर्माण झाली असेल, ती साहजिक देखील आहे. परंतु आता खचून जाण्यापेक्षा येणार्‍या काळातील जुन्या पद्धतीच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे.

2023 च्या मुख्य परीक्षेच्या तणावात येणार्‍या परीक्षा वरून लक्ष विचलित होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. वर्णनात्मक परीक्षेच्या संदर्भात दर्जेदार इंग्रजी अभ्यास साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. मराठी मध्ये या संदर्भात असलेली कमतरता भरून काढण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. या संदर्भात लवकरच YouTube आणि टेलिग्रामच्या माध्यमातून आपला संपर्क चालू राहील. तसेच या संदर्भात एका वेबसाईटचे देखील काम आपण हाती घेणार आहोत.

तसेच #UPSC ची मराठीत तयारी करणार्‍यांना या निर्णयामुळे जरी आनंद झाला असेल तरी तुमची स्पर्धा आता आणखी वाढणार आहे, याचा विसर पडू देवू नका. सांगायचा मुद्दा एवढाच की कमी जास्त फरकाने सर्वांनाच कष्ट घ्यावे लागणार आहेत, तशी तुम्ही मनाची तयारी करून ठेवा.

तुम्ही निबंधाच्या तयारी साठी @EssayInMarathi तसेच राज्यशास्त्राच्या तयारी साठी आपले @PSIRin_Marathi हे टेलिग्राम चॅनल सोबत जोडले जाऊ शकता.

धन्यवाद!

Join @UPSCin_Marathi
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून वर्णनात्मक करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ठाम, तयारीला लागा.

Join @EssayInMarathi