निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
888 subscribers
49 photos
1 video
10 files
19 links
मराठी माध्यमातुन निबंध लेखनाची तयारी!
Download Telegram
यंदाचा शांततेचा नोबेल दोन संस्था आणि एक मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यात विभागून देण्यात आला आहे. सध्याच्या युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर ही गोष्ट अपेक्षित होती. युद्धाच्या काळात नागरी समाज आणि मानवी हक्क संघटना तसेच कार्यकर्ते काय भूमिका बजावतात याकडे जगाचे लक्ष लागून असते. यंदाच्या शांतता नोबेल निवडीवर या पार्श्वभूमीचे प्रतिबिंब दिसून येते.

UPSC/MPSC च्या दृष्टीने विचार केला असता आपल्या लक्षात येईल की
#GS2 आणि #PSIR मध्ये नागरी समाज, मानवी हक्क आणि मानवी हक्क चळवळी यांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने करणे अपेक्षित आहे.

Join
@UPSCin_Marathi
तसं माझं मूळ तर इंजीनियरिंगचं आहे, परंतु स्पर्धा परीक्षामुळे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (#PSIR) या विषयाला जवळून अभ्यासायची संधी मिळाली.

कालांतराने पोस्ट ग्रॅज्युएशन पार पडले व नेटची परीक्षा देखील दिली. त्याच काळात upsc मुख्य परीक्षा असल्यामुळे नेटचा अभ्यास काही करता आला नाही. Upsc च्या अभ्यासावर माझी नेट तर आरामशीर निघाली पण JRF (Junior Research Fellowship) 1.07 percentile ने हुकली. अर्थातच तेव्हा संमिश्र भावना होत्या, कारण एका बाजूला नेट निघाल्याचे सुख तर दुसर्‍या बाजूला JRF न मिळाल्याचे दुःख.

त्यामुळे तेव्हाच ठरवले की एकदा तरी थोडा व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा देऊया. यंदा शिकवण्याच्या प्रक्रियेतून मिळेल तसा वेळ काढून अभ्यास केला व परीक्षा दिली. कालच या परीक्षेचा निकाल लागला आणि मी 99.50% percentile मिळवून JRF पास झालो.☺️ यासर्व प्रक्रियेत अर्थातच #upsc च्या तयारीचा खूप मोठा फायदा मला झाला. तसेच या निकालाच्या नंतर शिकवण्यासाठी आणखी जास्त हुरूप देखील आले आहे.🤩

या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असलेले माझे कुटुंबीय आणि सर्व मित्र-मैत्रिणींचे मी या सुखद क्षणी आभार मानतो. धन्यवाद 🙏🏾

- ज्ञानेश्वर